व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोवर साई पल्लवी संतापली, म्हणाली...

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि राजकुमार पेरियासामी या दोघांचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होतं आहे.
व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोवर साई पल्लवी संतापली, म्हणाली...
Published on

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि राजकुमार पेरियासामी या दोघांचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होतं आहे. या फोटोत साई पल्लवी आणि राजकुमार पेरियासामी या दोघांच्या गळ्यात फुलांच्या माळा दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटोंवर साई पल्लवीने मात्र संताप व्यक्त केला असून अशा अफवा पसरवणाऱ्यांना चांगलचं खडसावलं आहे.

साई पल्लवीने एक ट्विट शेअर केलं असून यात तिने लिहिलं आहे की, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला अफवांची पर्वा नाही. पण जेव्हा त्यात कुटुंबातील लोकांचा मित्रांचा समावेश असतो. तेव्हा मला बोलावलं लागेल. माझ्या चित्रपटाच्या पुजा समारंभातील फोटो जाणूनबुजून क्रॉपल करुन घृणास्पद हेतून प्रसारित करण्यात आला. कामासाठी चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी असताना, जेव्हा या बेकार गोष्टींसाठी स्पष्टीकरण द्यावं लागणं हे निराशाजनक आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हा निव्वळ नीचपणा आहे.

साई पल्लवीचा हा फोटो एसके २१ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या फोटोत तिच्याबरोबर तिचा सहकलाकार राजकुमार पेरियासामी दिसत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पूजा समारंभाचे आयोजन केले असताना हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

साई पल्लवीने उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर कलाविश्वास आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती तिच्या सिनेमात अत्यंत कमी मेकअपमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे एकदा साईने २ कोटी रुपयांची एक फेअरनेस क्रीमची जाहिरात धुडकावली होती. प्रेक्षकांमध्ये साई पल्लवीची खूप क्रेझ पहायला मिळते.

logo
marathi.freepressjournal.in