सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती शेवटची 'लॉकडाऊ' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतूक झालं होतं. सई सोशल मीडियावर सक्रिय असून ती वेळोवेळी तिच्या चाहत्याना अपडेट देत असते. सई तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबत पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. सध्या सई स्पेममध्ये फिरत आहे. आता ती स्पेनमध्ये नेमकं कोणासोबत फिरतेय हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
सईने काही दिवसांपूर्वी निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर बऱ्याचदा ते एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. सईने सध्या स्पेनमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सईने जे फोटो शेअर केलेत त्यात ती एकटीच दिसत आहे. मात्र ती अनिश जोगसोबत स्पेनमध्ये फिरायला गेली आहे. कारण सई आणि जोग दोघांनी तिथले फोटो शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटो पैकी एक फोटो दोघांनी इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला असल्याने ते एकत्र असल्याचं समोर आलं आहे.
अनिश जोग हा प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता असून त्याने टाईमप्लीज, व्हायझेड, धुराळा, मुरांबा यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.