७ वर्षं सैराट झालं जी ....

सैराट या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली.आर्ची आणि परश्यानी या 'सैराट'च्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.
७ वर्षं सैराट झालं जी ....

तमाम महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सैराट या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. अजूनही या चित्रपटाची, आर्ची -पारश्याची आणि सैराटच्या गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडते . आर्ची आणि परश्यानी या 'सैराट'च्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.

आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

आकाशने ठोसरने सैराट चित्रपटातील त्याचे रिंकू राजगुरूसोबतचे फोटो शेअर केले आहेत. आकाशने ५ फोटोंची शृंखला शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये रिंकू लाल साडीमध्ये दिसत आहे. तर आकाशने पंधरा सदरा घातला आहे आणि दोघे खळखळून हसत आहेत.

दुसऱ्या फोटोमध्ये रिंकूने पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या चुडीदार ड्रेस घातला असून आकाशने निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि जीन्स घातली आहे. तिसरा फोटो हा त्यांच्या चित्रपटातील लग्नाच्या प्रसंगाचा फोटो आहे.

चौथ्या फोटोमध्ये आर्चीने परशाच्या गळ्यात हात टाकला आहे आणि दोघेही बसले आहेत. तर पाचवा फोटो या चित्रपटातील आर्चीच्या डोहाळ जेवणाचा फोटो आहे. ज्यात आर्चीने हातात धनुष्यबाण पकडले आहे.

तर या फोटोंना कॅप्शन देत आकाशने लिहिले आहे, सैराटची ७ वर्ष, अविस्मरणीय प्रवास. रिंकू आणि आणि आकाश यांनी सैराट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.या दोघांनाही प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळालं आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in