प्रसिद्ध उद्योजक नीता अंबानी यांच्या 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चा (NMACC) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील सर्व टॉपच्या स्टार्सनी हजेरी लावली होती. झेंडाया, टॉम हॉलंड आणि गिगी हदीद या हॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या फोटोने लक्ष वेधून घेतले. तब्बल 20 वर्षांनंतर हे दोघे एकाच फोटोत दिसले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटोमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान नीता अंबानी, टिम हॉलंड आणि झेंडयासोबत एका फ्रेममध्ये पोज देताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनही तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत याच फ्रेममध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्या दिसत असली तरी तिचा चेहरा केसांनी झाकलेला आहे. तर चित्रात आराध्याच्या चेहऱ्याचा बाजूचा भाग स्पष्ट दिसत आहे.
सलमान आणि ऐश्वर्याला माहितही नसेल की ते एकाच फ्रेममध्ये क्लिक झाले आहेत. मात्र वर्षांनंतर या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्याने चाहते खूप खूश आहेत आणि जोरदार कमेंटही करत आहेत.