सलमानच्या वाढदिवसाला जमले बॉलिवूड तारांगण; वांद्रे-वरळी सीलिंक झळाळला; पनवेल फार्महाऊसवर सेलिब्रिटींची मांदियाळी

वांद्रे-वरळी सीलिंक शनिवारी विशेष प्रकाशयोजनेमुळे झळाळून गेला होता. त्याला कारणही तसेच होते म्हणा.. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या षट्यब्दीचे. पनवेलच्या फार्महाऊसवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यापासून ते बॉलिवडूमधील सेलिब्रिटींची, कुटुंबीयांची आणि जीवलग मित्रमैत्रिणीची मांदियाळी होती...
सलमानच्या वाढदिवसाला जमले बॉलिवूड तारांगण; वांद्रे-वरळी सीलिंक झळाळला; पनवेल फार्महाऊसवर सेलिब्रिटींची मांदियाळी
सलमानच्या वाढदिवसाला जमले बॉलिवूड तारांगण; वांद्रे-वरळी सीलिंक झळाळला; पनवेल फार्महाऊसवर सेलिब्रिटींची मांदियाळी
Published on

मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंक शनिवारी विशेष प्रकाशयोजनेमुळे झळाळून गेला होता. त्याला कारणही तसेच होते म्हणा.. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या षट्यब्दीचे. आकाशात हेलकावे खाणारा सलमानला शुभेच्छा देणारा संदेश पाहताच लक्षावधी चाहत्यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मोबाईलमध्ये त्या स्मृती कॅप्चर केल्या आणि निमिषात त्या विविध व्हॉट्सॲप समूहांवर व्हायरलही झाल्या.

पनवेलच्या फार्महाऊसवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यापासून ते बॉलिवडूमधील सेलिब्रिटींची, कुटुंबीयांची आणि जीवलग मित्रमैत्रिणीची मांदियाळी होती आणि त्यावर कैतरिना कैफ हिने "टायगर टायगर टायगर... तू आहेस तो सुपर ह्युमन" प्रेम आणि प्रकाशाने तुझे जीवन कायमच उजळत राहो, अशा शुभेच्छा देत त्यावर कळसच चढविला.

कतरिना आणि सलमान यांच्यात दीर्घकाळ वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध राहिले आहेत, हे सर्वज्ञात आहे. बराच काळ ते दोघे एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते; मात्र, त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे अखेर दोघे वेगवेगळ्या वाटांवर गेले.

मराठी कलावंतांची हजेरी

महेश मांजरेकर, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख त्यांची मुले रियान आणि राहील, करिश्मा कपूर, संजय दत्त, हुमा कुरेशी, तब्बू, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी आणि अनुप सोनी, संगीता बिजलानी हेही सहभागी झाले होते.

सलमान खान लवकरच अपूर्वा लाखिया दिग्दर्शित 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. १६ जून २०२० रोजी झालेल्या या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते, तर चिनी बाजूलाही मोठे नुकसान झाले होते.

चित्रांगदा प्रमुख भूमिकेत

या संघर्षानंतर भारत-चीन तणाव वाढला होता. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आणि गलवान खोऱ्याच्या आसपास सैन्याने तैनाती वाढवली, तसेच "संभाव्य" चिनी आक्रमण रोखण्यासाठी सीमाभागात पाहणीसारख्या विविध हालचाली करण्यात आल्या. या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंग सलमान खानच्या समोर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

पापाराझींमध्ये कापला केक

या सोहळ्यासाठी सलमानचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान उपस्थित होते. त्याची बहीण अर्पिता खान शर्मा आणि तिचे पती आयुष शर्मा हेही कार्यक्रमाला आले होते. टी-शर्ट आणि निळ्या डेनिम्समध्ये कॅज्युअल लूकमध्ये असलेला सलमान क्लीन-शेव्हन अवतारात अधिक तरुण दिसत होता. कडक सुरक्षाव्यवस्थेत सलमान थोड्या वेळासाठी बाहेर येऊन पापाराझींमध्ये केक कापताना दिसला. काही दृश्यांमध्ये तो लाल-पांढऱ्या रंगाचा केक कापताना दिसत असून पापाराझी 'हॅपी बर्थडे' गाणे गात होते.

logo
marathi.freepressjournal.in