
सध्या ‘टायगर ३’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे .या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे मनीष शर्मा तर सलमान खान आणि कतरीना कैफ यांची सिझलिंग केमिस्ट्री या चित्रपटात पुन्हा पाहायला मिळणार आहे. पण नुकतंच ‘टायगर ३’च्या सेटवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुद्द सलमानने खुलासा केला आहे.
‘टायगर ३’च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत झाली आहे. खुद्द सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर पाठमोरा फोटो टाकत याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोत सलमान खान पाठमोरा उभा आहे आणि त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. नेमकी ही दुखापत कशामुळे झाली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. सलमानचे ट्वीट पाहता त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचं दिसतंय.
हा फोटो शेअर करताना सलमानने लिहिलं की, “जेव्हा तुम्हाला असं वाटतं की साऱ्या जगाचं ओझं तुमच्याच खांद्यावर आहे, तेव्हा तो म्हणतो जग वगैरे बाजूला ठेव, पाच किलोचे डंबेल उचलून दाखव आधी . टायगर जखमी आहे."
भाईजानच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे .