सलमान खानने विकी कौशलचा केला अपमान? व्हिडिओ व्हायरल

सलमान खानने विकी कौशलचा केला अपमान? व्हिडिओ व्हायरल

आयफा २०२३ मध्ये नेमकं असं काय घडलं ?

आयफा २०२३ हा बॉलीवूड पुरस्करांमधील ग्रँड सोहळा सध्या अबुधाबीमध्ये सुरु आहे. या सोहळ्यात सलमान खान त्याच्या नव्या लूकमध्ये दिसत आहे . यासोबतच अभिषेक बच्चन, फराह खान राजकुमार राव, विकी कौशल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

IIFA 2023 च्या पत्रकार परिषदेतील सलमान खान आणि विकी कौशल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे .सलमानच्या बॉडीगार्डने ज्या पद्धतीने विकीला बाजूला केलं, ते धक्कादायक आहे. आश्चर्य म्हणजे यावर सलमान खान काहीच बोलला नाही आणि सलमान खाननेदेखील विकीकडे दुर्लक्ष केलं, यामुळे नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

सलमान खानचे चाहते काहीही झालं तरी सलमानचं तोंडभरून कौतुक करायला विसरत नाहीत पण विकी कौशलच्या चाहत्यांना मात्र या घटनेमुळे राग आला आहे आणि सलमानचं हे वर्तन ठीक नाही असं ते म्हणत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, सलमान त्याच्या बॉडीगार्डसह प्रवेश करतो. यावेळी विकी त्यांच्यापासून काही अंतरावरच उभा असलेला दिसत आहे. जसजसा सलमान जवळ येतो तसतसा विकी सलमानच्या दिशेने हात पुढे करताना आणि त्याला अभिवादन करताना दिसतो. सलमान खानचे बॉडीगार्ड विकीला सलमानपासून दूर ढकलतो, सलमान विकीला हस्तांदोलन करत नाही, फक्त एक नजर टाकतो आणि निघून जातो. विकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत. त्याने दुसऱ्यांदा हात मिळवण्याचाही प्रयत्न केला होता, पण सलमान मात्र तिथून निघून जातो.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच, दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं अनेकांना वाटलं. तसेच काहींना विकीला सर्वसामान्य माणसाप्रमाणे सलमानपासून दूर केलं असंही वाटलं.सलमान खानची हि वर्तणूक ठीक नाही असं अनेकांना वाटलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in