Salman Khan : धमकीनंतर सलमानसह कुटुंबियांवर लादले निर्बंध; चाहत्यांनाही 'या' गोष्टी करण्यास मनाई

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने भाईजान सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी घातले त्याच्यासह कुटुंबियांवर निर्बंध
Salman Khan : धमकीनंतर सलमानसह कुटुंबियांवर लादले निर्बंध; चाहत्यांनाही 'या' गोष्टी करण्यास मनाई

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या तरुणाने सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला ई-मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. केवळ सलमानच्या कुटुंबीयांनाच नाही तर त्याच्या चाहत्यांवरही पोलिसांनी निर्बंध घातल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या सुरक्षेसाठी त्याच्या घराबाहेर काही निरीक्षक आणि ८ ते १० कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, या अहवालानुसार, सलमानच्या चाहत्यांना त्याच्या मुंबईतील घराखाली फिरण्यास किंवा जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर त्याचे अनेक चाहते झुलताना दिसतात आणि मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक सलमानच्या घराबाहेर फोटो काढतो. मात्र आता हे चाहते सलमानच्या घराबाहेर फिरू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.”

दरम्यान, शनिवारी सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्या तरुणाचे नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या बंदोबस्तात वाढ केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in