'बिग बॉस'मधील सलमान खानचे काही खास क्षण ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

सलमान खानचा सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' हा ड्रामा, विनोदाने भरपूर असून मनोरंजनाचा केंद्रबिंदू बनला आहे
'बिग बॉस'मधील सलमान खानचे काही खास क्षण ज्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

सलमान खानचा सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' हा ड्रामा, विनोदाने भरपूर असून मनोरंजनाचा केंद्रबिंदू बनला आहे. तसेच, या शोला प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, अनेक चढ-उतारांसह, सलमान खान बिग बॉसच्या घरात एक सक्षम होस्ट म्हणून उदयास आला असून त्याने नेहमीच योग्यतेची बाजू घेतली आहे. अलीकडेच आपल्या १६व्या सीझनमध्ये प्रवेश करत असलेल्या या शोने टेलिव्हिजनवर खूप मोठा पल्ला गाठत प्रेक्षकांना खरोखरच काही संस्मरणीय क्षण दिले आहेत.

सलमान खानने अब्दु रोजिकसाठी खास भेटवस्तू आणली

हा क्षण बिग बॉस १६ मध्ये टिपला गेला जेव्हा सलमान खानने अब्दु रोजिकसाठी भेटवस्तू आणली. जेव्हा अब्दुने बॉक्स उघडून त्यातील लहान डंबेल पहिले तेव्हा अब्दु खूप आनंदी झाला होता. तसेच, या एपिसोडमध्ये आणखी काही मजेशीर क्षण पाहायला मिळाले जेव्हा मस्करी करत सलमान खानने शोच्या महिला कलाकारांना प्रभावित करण्यासाठी कसरत करावी असे अब्दूला म्हणाला.

सलमान खानला घर साफ करताना पाहायला मिळाले

'बिग बॉस' सीझन १३ मधील या घटनेने स्पर्धक आणि दर्शकांना धक्का बसला होता. या घटनेत स्पर्धकांच्या अस्वच्छतेपायी सलमान खानने स्वतः घरात एन्ट्री केली. तसेच, त्याने स्वयंपाकघरातील भांडी आणि बाथरूम साफ केले. या घटनेनंतर स्पर्धक सुपरस्टारची माफी मागताना दिसले.

सलमान खानने दिवंगत सिद्धार्थ शुक्ला यांना वाहिली श्रद्धांजली

बिग बॉस १५ मधील हा एक हृदयस्पर्शी क्षण आहे जेव्हा सुपरस्टार सलमान खानने बिग बॉस १३चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांना श्रद्धांजली वाहिली. सलमान खानने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यासाठी भावनिक भाषण देऊन शोची सुरुवात केली. दरम्यान शोमध्ये "सिद्धार्थ शुक्लाची जागा कोणी घेऊ शकत नाही" असे म्हणताना दिसला.

जेव्हा सलमान खानला 'टाइम आऊट' म्हणाला इमाम सिद्दीकी

सीझन ६ मधील हा क्षण कदाचित सर्वात धक्कादायक क्षण होता जेव्हा इमाम सिद्दीकी यांनी सलमान खानला संभाषणादरम्यान "टाइम आउट" करण्यास सांगितले. जेव्हा इमामला त्याच्या सहकारी स्पर्धकांपैकी एकाला नॉमिनेट करण्यास सांगितले गेले, ज्याने सलमानच्या वारंवार आठवण करून देण्याकडे लक्ष दिले नाही ज्यामुळे तो नाराज झाला. पण इमामने सलमानला 'टाइम आऊट' सांगितल्यावर त्याचा संयम सुटला आणि त्यानंतर सलमान डिझायनरला ओरडला आणि पुन्हा पुन्हा सॉरी म्हणाला.

सलमान खानने रश्मी देसाईची काउंसलिंग केली

हा क्षण सीझन १३मध्ये दिसला जेव्हा सलमान खान स्वतः रश्मी देसाईचे सांत्वन करण्यासाठी घरात दाखल झाला होता. जेव्हा सलमान खानने अरहान खानबद्दल खुलासा केला तेव्हा रश्मीने प्रपोजल स्वीकारले असले तरी सत्य हाताळणे तिला खूप कठीण झाले. यामुळे सलमान घरात एन्ट्री करत रश्मीला मिठी मारून समजावताना दिसला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in