
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'येंटम्मा' हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे अभिनेता सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, राम चरण आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान, राम चरण आणि व्यंकटेश पिवळ्या शर्ट आणि पांढर्या धोतीमध्ये नाचताना दिसत आहेत. मात्र, माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर हे गाणे आपल्या संस्कृतीला बदनाम करत असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी शिवरामकृष्णन यांनी केली आहे.
आजकाल लोक पैशासाठी काहीही करतात. या लोकांना लुंगी आणि धोतर मधला फरक कळत नाही का? हा चित्रपटाचा सेट असला तरी तो मंदिर म्हणून दाखवला जात आहे. चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की ते मंदिराच्या आवारात दागिने घालत नाहीत. असेही त्यांनी म्हटले. हे गाणे विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे. शब्बीर अहमद यांनी हे गाणे लिहिले आहे.