'जवान' चा प्रिव्ह्यू पाहुन सलमानने दिलेले प्रतिक्रिया चर्चेत ; म्हणाला...

शाहरुख या सिनेमात वेगवेळ्या भूमिका साकारनार असल्याचं दिसून येत आहे. त्याचे वेगवेळ्या भूमिकेतील फोटो प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सूकता आणखीच ताणली गेली आहे
'जवान' चा प्रिव्ह्यू पाहुन सलमानने दिलेले प्रतिक्रिया चर्चेत ; म्हणाला...

बॉलिवूडचा किंग खान म्हणून जगभर ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या 'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण होतं. त्याच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. सध्या तो त्यांच्या आगामी 'जवान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा 'जवान' या सिनेमाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला. यानंतर तर त्यांच्या या चित्रपटाविषयी जास्तीची उत्सूकता त्याच्या चाहत्यांमध्ये तसंच सिनेरसिकांमध्ये निर्माण झाली आहे.

'जवान' सिनेमाचा प्रिव्ह्यू रिलीज झाल्यानंतर त्याच्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहीली जात आहे. या प्रिव्ह्यतून शाहरुख या सिनेमात वेगवेळ्या भूमिका साकारनार असल्याचं दिसून येत आहे. त्याचे वेगवेळ्या भूमिकेतील फोटो प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सूकता आणखीच ताणली गेली आहे. आता बॉलिवूडच्या भाईजान सलमान खान यानेदेखील शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचा प्रिव्ह्यू बघीतला आहे.

'जवान' सिनेमाचा प्रिव्ह्यू बघीतल्यानंतर अभिनेता सलमान खानने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करुन तो म्हणाला, "पठाण जवान बन गया, उत्कृष्ट ट्रेलर, मला खूप आवडला. आता हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच पाहायला हवा. मला खात्री आहे की पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहणार. मजा आ गया वाह..." शाहरुखने देखील त्याची पोस्ट शेअर करत त्याला धन्यवाद दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in