Sam Bahadur Box Office Day 3: विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद; तिसऱ्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई

सध्या चित्रपटगृहात दोन मोठे चित्रपट एकेमेकांसमोर धडकले आहेत.
Sam Bahadur Box Office Day 3: विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद; तिसऱ्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई

सध्या चित्रपटगृहात दोन मोठे चित्रपट एकेमेकांसमोर धडकले आहेत. ज्यामध्ये रणबीर कपूरचा 'अनिमल' तर दुसरा विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' यांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटाची कथा पूर्णतः वेगळी असली तरी दोन्ही कलाकारांची प्रसिद्धी काही कमी नाही. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत.

रणबीर कपूरचा 'अनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत असला तरी 'सॅम बहादूर' या चित्रपटाने देखील आपले स्थान निर्माण केले आहे. 'सॅम बहादूर' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई थंड असली तरी विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात रिलिज झाला होता. रिलिज झाल्यानंतर या चित्रपटाला समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चाहत्यांनी मात्र सुरुवातीला काही खास प्रतिसाद दिला नाही. मात्र, आता हळू हळू प्रेक्षकवर्ग या चित्रपटाकडे वळताना दिसत आहेत.

'सॅम बहादूर' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.25 कोटींची कमाई केली तर शनिवारी म्हणजेच रिलिजच्या दुसऱ्या दिवशी ' 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. SACNLच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सॅम बहादूर' या चित्रपटाने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी तब्बल 10.30 कोटींचा गल्ला जमावाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 25.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in