'त्या' 30 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमुळे समीर चौघुलेला मागावी लागली माफी; म्हणाला...

कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो." असं स्पष्टीकरण समीरनं त्या व्हायरल व्हिडिओवर दिलं आहे.
'त्या' 30 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमुळे समीर चौघुलेला मागावी लागली माफी; म्हणाला...

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमातील कलाकार आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या शो'मुळे या कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. समीर चौघुले हा कलाकार याच शो'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. सध्या समीर एका नव्या कारणानं चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानं त्याला माफी मागावी लागली आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

समीर चौघुले याने एका स्किटमध्ये तारपा नृत्य (आदिवासी नृत्य) सादर केलं होतं. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. यानंतर या व्हिडिओवरुन समीर चौघुलेवर अनेकांनी टीका केली. यामुळे समीरनं सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. त्याचा माफी मागितल्याच्या व्हिडिओत समीर म्हणतो की, "मी एका स्किटमध्ये तारका नृत्य सादर केलं होत. त्या नृत्याची 30 सेकंदाची एक क्लिप व्हायरल झाली. माझ्या लक्षात आलं की, यामुळे माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या. यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो." असं समीरनं या व्हिडिओत म्हटलं आहे.

या व्हिडिओत बोलताना समीर पुढे म्हणतो की, "हा प्रकार अनावधानाने झाला होता. हा प्रकार पुन्हा होणार नाही याची मी ग्वाही देतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो." असं स्पष्टीकरण समीरनं त्या व्हायरल व्हिडिओवर दिलं आहे.

समीर चौघुले हा 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमात सर्वांना खळखळून हसवत असतो. याच शो'मुळे समीर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचला आहे. त्याने अनेक चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. मात्र, त्याला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात या शो'चा मोठा वाटा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in