Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांना कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर

नुकतेच प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या नाटकांचे १२५०० प्रयोग पूर्ण झाले. त्यांचे मराठी नाटक क्षेत्रात अमूल्य योगदान आहे.
Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांना कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर
Published on

मराठी नाटक क्षेत्रातील एक नामवंत कलाकार प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अशामध्ये त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतः प्रशांत दामले यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रशांत दामले यांनी, "आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असंच प्रेम असु दे" असे म्हणत सर्वांचे आभार मानले. संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. प्रशांत दामले हे १९८३ पासून नाटक, चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट केले आहेत. त्यांचे नाटकावरील प्रेम हे जगजाहीर आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला.

logo
marathi.freepressjournal.in