Heeramandi: The Diamond Bazaar: संजय लीला भन्साळीच्या यांच्या ओटीटी पदार्पणाच्या वेब सिरीजने सगळे रेकॉर्ड्स तोडले आहेत. नेटफ्लिक्स आणि संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी: द डायमंड बझार' ही वेब सिरीज नुकतीच रिलीझ झाली. रिलीझच्या पहिल्याच आठवड्यात 'हीरामंडी' ही सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय वेब सीरिज (Viewership)बनली आहे. या वेब सिरीजने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या वेब सिरीजची फार आधीपासून चर्चा होत होती. या सिरीजला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून अनेक संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. वेब सिरीजमधील चुका ते स्टार कास्ट सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. परंतु, तरीही वेब सिरीज ओटीटीवर वर्चस्व गाजवत आहे. दरम्यान, नेटफ्लिक्सने आता या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० नॉन-इंग्रजी कंटेन्ट मालिका आणि चित्रपटांची यादी (Most-Watched Indian Show On Netflix) जाहीर केली आहे, ज्यामध्ये 'हिरामंडी'चे नाव देखील समाविष्ट आहे.
किती मिळाली आहे व्ह्यूअरशिप?
नेटफ्लिक्सच्या व्ह्यूअरशिपच्या या यादीत 'हीरामंडी: द डायमंड बाजार' दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वेब सिरीजच्या पहिल्याच आठवड्यात ती ४५ लाख वेळा पाहिली गेली आहे. हा शो पाहण्यासाठी दर्शकांनी नेटफ्लिक्सवर ३३ करोड तास खर्च केले आहेत. या मालिकेने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर १२ करोड व्ह्यूज मिळवले. अशा परिस्थितीत आगामी काळात 'हिरमंडी'ला दृश्यांच्या दृष्टीने मोठा फायदा मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.
कपिल शर्माच्या शोला टाकले मागे
हीरामंडी: द डायमंड बाजार'ने कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'लाही व्ह्यूअरशिपच्या बाबतीत मागे टाकले आहे. कपिलचा शो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २५ लाख व्ह्यूजसह तिसऱ्या क्रमांकावर होता, तर सहाव्या आठवड्यात शोची व्ह्यूअरशिप १० लाखांपर्यंत घसरली. 'हिरमंडी' ४३ देशांमध्ये प्रसारित झाली आहे.
कशी आहे स्टारकास्ट?
मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि फरदीन खान यांच्यासह 'हिरामंडी'ची उर्वरित स्टारकास्ट देखील चर्चेत आहे.