Video : सारा तेंडुलकर, शुबमन गिलची बहीण एकत्र दिसल्या; कॅमेऱ्यात कैद होणार हे लक्षात येताच लपवला चेहरा

शुबमन आणि साराच्या नात्याची माध्यमांमध्ये नेहमी चर्चा रंगत असते. असे असले तरी या दोघांनी अद्याप आपल्या नात्याबद्दल कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आता सारा आणि शहनीलच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात आहेत.
Video : सारा तेंडुलकर, शुबमन गिलची बहीण एकत्र दिसल्या; कॅमेऱ्यात कैद होणार हे लक्षात येताच लपवला चेहरा

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा नेहमी सुरु असते. अशात सारा तेंडुलकर काल रात्री(20जानेवारी) शुबमन गिलची बहीण शहनील गिल सोबत नाईट आऊट करताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शुबमन आणि सारा यांच्यातील नात्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

कॅमेरा पाहताच साराने लपवला चेहरा-

शनिवारी रात्री, सारा शुबमनच्या बहिणीसोबत वेळ घालवताना दिसली. मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर त्यांच्या कारमध्ये त्या दिसून आल्या. यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आकर्षक दिसणाऱ्या साराला छायाचित्रकारांनी कारमध्येच कॅप्चर केले. दोघेही कॅमेऱ्याद कैद होत आहोत हे लक्षात येताच सारा आणि शहनील अस्वस्थ झाल्या. यानंतर साराने हाताने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. तर, शहनीलने मास्क घातल्याचे दिसून आले.

शुबमन आणि साराच्या नात्याची माध्यमांमध्ये नेहमी चर्चा रंगत असते. असे असले तरी या दोघांनी अद्याप आपल्या नात्याबद्दल कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आता सारा आणि शहनीलच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. सारा आणि शुबमन यांचे नाते फायनल होणार की काय? असेही म्हटले जात आहे. मात्र, या दोघींनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापूर्वी काही काळासाठी शुबमन गिल आणि सारा अली खान यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. अभिनेत्री सारा अली खानला 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने जग चुकीच्या सारामागे लागल्याचे म्हटले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in