दिलजीत दोसांझचा ‘सरदार जी३’ वादाच्या भोवऱ्यात; पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या भूमिकेवर नेटकऱ्यांचा संताप

दिलजीत दोसांझचा आगामी पंजाबी चित्रपट ‘सरदार जी ३’च्या ट्रेलरमुळे मोठा वाद उफाळला आहे. कारण, या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर झळकणार आहे.
दिलजीत दोसांझचा ‘सरदार जी३’ वादाच्या भोवऱ्यात; पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या भूमिकेवर नेटकऱ्यांचा संताप
Published on

दिलजीत दोसांझचा आगामी पंजाबी चित्रपट ‘सरदार जी ३’च्या ट्रेलरमुळे मोठा वाद उफाळला आहे. दिलजीतच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अनेक भारतीय सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले असून दिलजीतला 'देशद्रोही' म्हणत जोरदार ट्रोल केलं जात आहे.

२२ जून रोजी दिलजीत दोसांझ आणि हानिया आमिर यांचा ‘सरदार जी३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये हानिया दिसल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. भारत-पाक तणाव अजून निवळला नसताना अशा अभिनेत्रीला चित्रपटात स्थान देणं ही अनेकांच्या मते देशविरोधी कृती आहे. भारत-पाक युद्धावेळी हानियाने भारताविरोधी मत प्रदर्शित केले. यामुळे ती भारतात ट्रोलही झाली होती.

सोशल मीडियावरील संतप्त प्रतिक्रिया

एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हंटले, "दिलजीत दोसांझने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो देशद्रोही आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतविरोधी विधान करणारी हानिया आमिर असूनही हा चित्रपट सुरू आहे."

तर दुसऱ्या युजरने म्हंटले की, "पहलगाम हल्ल्याला दोन महिने झाले आणि याच दिवशी पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत ट्रेलर रिलिज करणे ही लज्जास्पद गोष्ट आहे."

ट्रोल करणाऱ्यांनी हानियाच्या ऑपरेशन सिंदूरविषयी वादग्रस्त स्टोरीजची आठवण करून दिली. काही युजर्सनी तिची इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं, "हा चित्रपट फक्त परदेशातच प्रदर्शित होतोय, तुम्हाला माहिती आहे का? कारण त्यातली अभिनेत्री.", अशी रोषपूर्ण प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

भारतात प्रदर्शित होणार नाही चित्रपट

‘सरदार जी ३’ २७ जून रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नसून परदेशात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले आहे, की भारतात या चित्रपटाचा कोणताही शो होणार नाही. मात्र तरीही, भारतीय प्रेक्षकांमध्ये संताप कायम आहे. “भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असताना, दिलजीत त्यांना का घेतोय?” असा थेट सवाल लोक विचारत आहेत. दिलजीत दोसांझ आणि टीम 'सरदार जी ३'ने या प्रकरणावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in