Bigg Boss Marathi 5: कसं आहे यंदाचं बिग बॉस मराठीचं घर? जाणून घ्या यंदाची थीम

BIGG BOSS MARATHI NEW SEASON: 'बिग बॉस'च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमियर २८ जुलै रोजी झाला.
Bigg Boss Marathi 5: कसं आहे यंदाचं बिग बॉस मराठीचं घर? जाणून घ्या यंदाची थीम
Published on

‘बिग बॉस मराठी’च्या घरासाठी यंदा खास चक्रव्यूह थीम करण्यात आली आहे. घरातील प्रत्येक कोपरा खूप विचारपूर्वक रंगवण्यात आला आहे. घरामध्ये कोझी कॉर्नर आहेत. घरातील प्रत्येक गोष्ट गोलाकार ठेवण्यात आली आहे. यावरून चक्रव्यूह थीम हायलाईट होते.

बेडरूम

Bigg Boss Marathi 5: कसं आहे यंदाचं बिग बॉस मराठीचं घर? जाणून घ्या यंदाची थीम
Bigg Boss Marathi 5: छोटा पुढारी ते निक्की तांबोळी, 'क्यूके' अन् 'डीपी'चीही एंट्री; यंदा बिग बॉस मराठीच्या घरात 'हे' १६ स्पर्धक करणार कल्ला!

घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात खास अंडर वॉटर बेडरूम बनवण्यात आलं आहे. बेडरूममध्येच कॅप्टनसाठी आलिशान डायमंड रूम बनवण्यात आली आहे.

वॉशरुम

घरात सर्वात जास्त आकर्षित करतं ते म्हणजे चहूबाजूंनी आरश्यांनी सजलेलं त्यातील क्लासी वॉशरुम. त्यामुळेही तिथेही बिंबप्रतिबिंबाचा खेळ आहे.

लिव्हिंग रूम

कलरफुल लिव्हिंग एरियामध्ये रितेश भाऊ दर आठवड्याला स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. लिव्हिंग एरियात मुखवट्यांनी डिझाइन करण्यात आलेली ही भिंत जागा लक्षवेधी आहे. त्यामुळे स्पर्धकांचे मुखवटे इथेच उतरवले जातील.

किचन

Bigg Boss Marathi 5: कसं आहे यंदाचं बिग बॉस मराठीचं घर? जाणून घ्या यंदाची थीम
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांसाठी चक्क 'बिग बॉस'देखील थांबले

‘बिग बॉस’च्या घरातील किचनमध्ये स्पर्धक जेवण बनवण्याबरोबरच गॉसिपही करताना दिसतील.

खास कट्टा, बाल्कनी आणि गार्डन एरिया

‘बिग बॉस’च्या घरात यंदा ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी खास कट्टा तयार करण्यात आला आहे. गार्डन एरियामध्ये हिरवळ आहे. तसेच बाल्कनीदेखील आहे. घरातील प्रत्येक गोष्ट लांबून थ्रीडी वाटत असली तरी जवळ गेल्यावर त्यातील सौंदर्य दिसून येतं.

कन्फेशन रूम

कन्फेशन रूममधील रिफ्लेक्शन्स स्पर्धकांना गोंधळात पाडणारे आहेत.

जीम आणि स्विमिंग पूल

गार्डन एरियामध्ये स्पर्धांना व्यायाम करण्यासाठी जीम आणि स्विमिंग पूल आहे. एकंदरीतच 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं घर भान उडवणारं, चक्रावणारं आहे. या चक्रव्यूहात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in