शिवरायांवर आधारित 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट आणि नाटके प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
शिवरायांवर आधारित 'हे'  चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट आणि नाटके प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शिवरायांचा इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू आहे. शिवजयंतीनिमित्त शिवकालीन कथानकावर भाष्य करणारे चित्रपट तुम्ही बघायलाच हवे.

सिंहगड : 'सिंहगड' हा चित्रपट 1923 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बाबुराव पेंटर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. बाबुराव पेंटर आणि व्ही. शांताराम या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.

बाळ शिवाजी : शिवरायांच्या बालपणीच्या पराक्रमावर भाष्य करणारा 'बाळ शिवाजी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला होता. प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

छत्रपती शिवाजी : 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा सिनेमा 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता.

शेर शिवाजी : 'शेर शिवाजी' हा सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर, अमरिश पुरी मुख्य भूमिकेत होते.

सर्जा : 'सर्जा' सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. अजिंक्य देव, निळू फुले, रमेश देव, कुलदीप पवार आणि सीमा देव या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय : एका मध्यमवर्गीय माणसाला शिवाजी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता.

फर्जंद : फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

फत्तेशिकस्त : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.

शेर शिवराज : 'शेर शिवराज' या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा केलेला पराभव पाहायला मिळाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in