मराठी सिनेसृष्टीत 'अण्णा' अशी ज्यांची ओळख होती ते ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं आहे. ठाण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते.
मराठी चित्रपट, मालिका, नाटक, ओटीटी या सर्व माध्यमात त्यांनी त्यांच्या अभिनयाने वेगळी छाप पडली होती. गेल्या चार दशकांहून अनेक काळ ते मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. शंभरहून अधिक मराठी नाटकात त्यांनी काम केलं होतं. तर ३० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटदेखील त्यांनी केले होते.
सध्या सुरु असलेली लोकप्रिय मराठी मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेतदेखील त्यांची वेगळी भूमिका होती. स्वप्नील जोशी यांच्यासोबत त्यांनी 'समांतर' या मराठी सिरीजमध्ये केलेली भूमिकाही विशेष गाजली होती.
९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे जयंत सावरकर अध्यक्ष होते.
सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. जयंत सावरकर यांना अनेक जण कलाविश्वात गुरुस्थानी मानत असत.