स्टेजवरच एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन, रंगभूमीवरच मावळली प्राणज्योत

Satish Joshi Passed Away: मराठी रंगभूमीचे एक प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार सतीश जोशी यांची १२ मे रोजी प्राणज्योत मावळली.
स्टेजवरच एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन, रंगभूमीवरच मावळली प्राणज्योत
Rajesh Deshpande /Facebook

Marathi Senior Actor Satish Joshi: मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे १२ मे रोजी एका कार्यक्रमादरम्यान रंगमंचावर सादरीकरण करत असतानाच दुःखद निधन झाले. रंगोत्सवात सादरीकरणावेळीच ते स्टेजवर कोसळले. ही घटना गिरगाव येथील ब्राह्मण सभा या ठिकाणी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

जोशी यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना तातडीने हरिकृष्ण दास रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यांनी काही वेळातच अखेरचा श्वास घेतला. या घटनेबद्दल त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी फेसबुकवर शोक व्यक्त करत लिहिले की, " आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला . ओम शांती ओम ..."

या घटनेबदल अधिक लिहित राजेश देशपांडे यांनी सांगितले की " सृजन द क्रिएशनच्या कार्यक्रमात घडलेली ही घटना नाही ह्याची कृपया नोंद माध्यम प्रतिनिधींनी घ्यावी. कारण तशी बातमी कुणीतरी प्रसिद्ध केली आहे. आज ११ वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा येथे गिरगाव रंगभूमीवर त्यांनी एक छोटा प्रवेश सादर केला. त्या नंतर ते अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांना हरिकृष्ण दास हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आले. थोड्याच वेळात प्राणज्योत मालवली."

सतीश जोशी हे मराठी इंडस्ट्रीतील एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी रंगभूमी ते मोठा पडदा अशा सगळ्याच व्यासपीठावर महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक मालिका, नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. भाग्यलक्ष्मी या टीव्ही मालिकेतील त्यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in