
प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जसिक अली बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जसिकला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याच्या अमिषानं दिग्दर्शक जसिकने तिचा सोबत लैंगिक कृत्य केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार दाखल झाल्याचं समजताच दिग्दर्शक जसिक हा काही दिवस फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
सध्या जसिकला पोक्सो कायद्यानुसार न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ३६ वर्षीय जसिक अलीने अल्ववयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं समजताच तमिळ चित्रपट विश्वात मोठी खळबळ उडाली. जसिक हा मुळचा कुरुंगवाडचा असून त्याला कोझिकडेइथून अटक करण्यात आली आहे. कोयिलेंडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसिकनं पीडितेला चित्रपटात चांगल्या स्थानावर काम देण्याचं अमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सध्या जसिकला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.