बॉलीवूडच्या(bollywood) किंग शाहरुख खानने(Shahrukh Khan) सध्या बॉक्स ऑफिसवर(Box Office) चांगलीच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. शाहरुख खानचा 'जवान'(Jawan) चित्रपट काल देशभर प्रदर्शित झाला. 'जवान'ला पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुखने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की त्याच्या चित्रपटा समोर बाकीचे सगळे सिनेमे फिके आहेत.
गेल्या महिन्यात सनी देओलचा 'गदर २'(Gadar -2) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गदर या चित्रपटचा सिक्वल असलेला हा सिनेमा तब्बल २२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटानं आतापर्यत पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचं दिसून आलं आहे. 'गदर २' अजूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मात्र, आता किंग खानचा 'जवान' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माहौल तयार झाला आहे. 'जवान'नं पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे.
'जवान'नं पहिल्याच दिवशी भारतात ७५ कोटींपेक्षा अधिक कमाई(Earnings) करुन बॉलीवूडचा किंग कोण आहे हे प्रेक्षकांना ठामपणे सांगितलं आहे. तर जगभरता पहिल्या दिवशी या सिनेमाने १५०हुून अधिक गल्ला जमवला आहे. 'गदर-२' नं पहिल्या दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला होता सोशल मीडियावर नेटकरी या दोन्ही कलाकारांची तुलना करु लागले आहेत. त्यात सनीनं बाजी मारली की शाहरुखनं असे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत. त्यात आता 'जवान'नं 'गदर २' ला जोरदार टक्कर दिली आहे.