शाहरुख घेतोय 'डंकी' चित्रपटासाठी मेहनत ; चार ओळींच्या शॉटसाठी घेतली सहा तासांची मेहनत

किंग खानचे दोन चित्रपट फार यशस्वी झाल्यानंतर आता तिसऱ्या सिनेमासाठीही किंग खानने खूप मेहनत घेतली आहे.
 शाहरुख घेतोय 'डंकी' चित्रपटासाठी मेहनत ; चार ओळींच्या शॉटसाठी घेतली सहा तासांची मेहनत
Published on

बॉलिवूडचा बादशहा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्यांच्या 'डंकी' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानच्या मागील सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. किंग खानचे दोन चित्रपट फार यशस्वी झाल्यानंतर आता तिसऱ्या सिनेमासाठीही किंग खानने खूप मेहनत घेतली आहे.

शाहरुखचा 'डंकी' या चित्रपटाची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेता अजय कुमार एक छोटी भूमिका साकारत आहे. दरम्यान एका मुलाखतीत अजय म्हणाला आहे की ,"चार ओळीच्या एका शॉट साठी शाहरुख खानने अनेक तास मेहनत घेतली आहे. कित्येक टेक दिले आहेत. एक शॉट चांगला देण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे".

अजय कुमार पुढे म्हणाला,"चित्रपटातील एक सीन फक्त दोन मिनिटांचा होता. पण हा सीन परफेक्ट करण्यासाठी शाहरुखने तब्बल सहा तास मेहनत घेतली आहे. तसंच शाहरुखने माझ्यासोबत या सीनची 20-25 मिनिटे तालिमदेखील केली आहे. 25 वेगवेगळ्या व्हेरिएशनचा हा सीन आहे. हा सीन शूट होईपर्यंत किंग खानने सहा तास त्यावर खूप मेहनत घेत होता".

शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'डंकी' या चित्रपटांत शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी आणि सतीश शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in