Shah Rukh Khan : किंग खानला मिळाला ग्लोबल आयकॉन पुरस्कार

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला (Shah Rukh Khan) सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी दुबईमध्ये केले सन्मानित
Shah Rukh Khan : किंग खानला मिळाला ग्लोबल आयकॉन पुरस्कार

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानला (Shah Rukh Khan) ४१व्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात (SBIF) प्रथम ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शारजा बुक अथॉरिटीचे अध्यक्ष अहमद अल अमेरी आणि SIBF चे जनरल को-ऑर्डिनेटर खवला अल मुजैनी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

SIBF (Sharjah International Book Fair) हे पुरस्कार अशा लोकांना सन्मानित करतो ज्यांच्या कारकिर्दीतील प्रयत्नांनी सांस्कृतिक अडथळे पार केले आहेत. ज्यांच्या कलेतील योगदानामुळे सीमा ओलांडून सांस्कृतिक संबंध निर्माण झाले आहेत. शाहरुख खानला हा पुरस्कार मिळण्याचे कारण असे की, शाहरुख खानने आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत ८०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. फक्त भारतातच नव्हे तर युरोप, मध्य पूर्व आणि यूएस मध्येही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान समारंभात त्याने दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगून अनेक तरुण प्रेक्षक सदस्यांना प्रेरित केले.

१९९२मध्ये शाहरुख खानने पहिल्याच चित्रपटातून स्वतःला रोमान्सचा बादशाह म्हणून प्रस्थापित केले. त्याने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, देवदास आणि माय नेम इज खान यासह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आता तब्बल ४ वर्षांनी तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एका मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in