Shah Rukh Khan: शाहरुख खानला विमानतळावर रोखले; का भरावा लागला लाखोंचा दंड?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा चर्चेत सापडला असून त्याला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते.
Shah Rukh Khan: शाहरुख खानला विमानतळावर रोखले; का भरावा लागला लाखोंचा दंड?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा एका चर्च आला आहे. त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर रोखल्याची बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान हा शारजाहवरुन येत असताना त्याला रोखण्यात आले. त्याच्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हर होते, ज्यांची किंमत १८ लाख आहे. यासाठी शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली. कस्टम विभागाच्या चौकशी आणि कारवाईत शाहरुखने सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख दुबईवरुन त्याच्या खासगी चार्टड प्लेनने मुंबई विमानतळावर पोहोचला होता. त्यानंतर त्याला टी३ टर्मिनलवर रोखण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगमधून बाबून - झुर्बक आणि रोलेक्स घड्याळांचे ६ बॉक्स, स्पिरिट ब्रँडची कव्हर अशी अंदाजे १८ लाख किमंतीची घड्याळांची कव्हर सापडली. यासोबतच अॅपल सीरिजची घड्याळ्यांचे कव्हर सापडले असून इतर घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in