Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या नावावर आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान

प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आणि निर्माता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा बादशाह असून, जगातील सर्वात यशस्वी फिल्मस्टार्स पैकी एक आहे.
Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या नावावर आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान

मेगास्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्या लोकप्रियतेची सीमा नाही. १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या किंग खानच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. अशा या बॉलीवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानच्या लोकप्रियतेला मर्यादा नाही. अशातच, शाहरुख खान आता आगामी रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित होण्यासाठी सज्ज आहे.

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलने आज जाहीर केले की प्रसिद्ध व दिग्गज भारतीय अभिनेता आणि निर्माता शाहरुख खानला रेड सी, जेद्दाह येथे फेस्टिव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात चित्रपट उद्योगातील असामान्य योगदानाबद्दल सन्माननीय पुरस्कार प्रदान केला जाईल.

प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आणि निर्माता शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह असून, जगातील सर्वात यशस्वी फिल्मस्टार्स पैकी एक आहे. चित्रपट उद्योगात तीन दशकांहून अधिक काळात शाहरुख खानने प्रेक्षकांचे मनोरंजन करत भारतात आणि जगभरात एक विलक्षण कारकीर्द निर्माण केली असून, त्यांच्या प्रयत्नांसाठी अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळवली आहे. शिवाय, त्यांचा सेल्फ मेड स्टार बनण्याचा प्रवास सर्वांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.

यावर बोलताना रेड सी आयएफएफचे सीईओ मोहम्मद अल तुर्की म्हणाले की, “आम्ही एक उल्लेखनीय प्रतिभा आणि जागतिक सुपरस्टार शाहरुख खानचा सन्मान करताना आनंदी आहोत. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कामगिरीपासूनच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे आणि आज काम करणाऱ्या जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षांनंतर, शाहरुख खान भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी सुपरस्टार्सपैकी एक आहे आणि जगभरातील रसिकांकडून त्यांना पसंती मिळते. या डिसेंबरमध्ये जेद्दाहमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

शाहरुख खान यावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले की, "रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून हा पुरस्कार मिळाल्याने मला खरोखरच सन्मान वाटतो. सौदी आणि त्या प्रदेशात माझ्या चाहत्यांमध्ये येणे विशेष आहे जे माझ्या चित्रपटांचे समर्थक आहेत. मी येथील प्रतिभा साजरी करण्यास आणि या रोमांचक चित्रपट समुदायाचा एक भाग बनण्यास उत्सुक आहे."

शाहरुखचा आगामी चित्रपट 'पठाण'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला ज्याने प्रेक्षकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला आहे. तसेच, अभिनेता सध्या जेद्दाहमध्ये राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी'या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत बोमन इराणी देखील आहेत. या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खानने केली असून हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्षित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in