फक्त ६० रुपयांत पाहता येईल शाहरुख खानचा 'जवान', रिलीज आधीच कोट्यावधींची तिकिटे बुक

'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून शाहरुखचे चाहते या चित्रपटासाठी खुप उत्सूक आहेत.
फक्त ६० रुपयांत पाहता येईल शाहरुख खानचा 'जवान', रिलीज आधीच कोट्यावधींची तिकिटे बुक

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 'पठाण' नंतर प्रेक्षकवर्ग जवानची आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांआधी जवानचा ट्रेलर रिलिज झाला असून त्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना शाहरुख एका नव्या रूपात दिसत आहे. एवढंच नव्हे तर या ट्रेलरमधील डायलॉग ही खूप चर्चेत आले आहे. किंग खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटासाठी खुप उत्सूक आहेत. 1 सप्टेंबरपासून जवानाचे अॅडव्हान्स बुकिंग देखील सुरू झालं आहे .

या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा इतका चांगली प्रतिसाद मिळाला की आत्तापर्यंत जवानची कोट्यवधी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी 'जवान' पहायचा आहे त्यामुळे या चित्रपटाचे बुकिंग काही ठिकाणी फुल झालं आहे. चित्रपटाच्या तिकिटांबद्दल बोलायचं झाल्यास तर या चित्रपटाची तिकीटे 500 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत विकली जातं आहेत. देशातील बहुतांश मेट्रो शहरांमध्ये 'जवान' च्या तिकिटांच्या किमती अधिक जास्त आहेत. चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई या शहरात देखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत हजार रुपयांच्यावर आहे तर दुसरीकडे हा चित्रपट तुम्ही फक्त 60 रुपयांमध्ये देखील पाहू शकणार आहात.

अनेक शहरांतील काही सिनेमागृहांमध्ये 'जवान' चित्रपटाची तिकिटं खुप स्वस्तात मिळणार आहेत.

- कोलकात्याच्या बारासात येथील लाली चित्रपटगृहात केवळ ६० रुपयांना तर बाल्कनीतील तिकिटे फक्त 80 रुपयांना विकली जात आहेत.

- पद्मा आणि बारापूर चित्रपटगृहातही चित्रपटाच्या तिकिटाचे दर केवळ 60 रुपये आहेत.

- बसुश्री चित्रपटगृहात जवानची तिकीटे 100 आणि 150 रुपयांना विकली जात आहेत.

- मुंबईत डोंगरी भागातील प्रमियर गोल्ड सिनेमागृहातही 100 रुपये आणि सर्कल सीट्सचे तिकिटे 112 उपलब्ध आहे

- चैन्नईतील एजीएस चित्रपटगृहात जवानचं तिकीट 65 रुपयात आहे

- दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये जवानच्या तिकीटाचे दर हे 70 ते 80 रुपये आहेत.

'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार देखील दिसणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in