
तामिळ चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अॅटली यांचे चाहते नेहमीच त्यांच्या कामाबद्दल उत्सुक असतात. आता, त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी, दिग्दर्शकाने पत्नी कृष्णा प्रियासोबत एक मोठी आणि अतिशय खास घोषणा केली आहे. अॅटलीची पत्नी कृष्णा प्रियाने सोशल मीडियावर काही हृदयस्पर्शी छायाचित्रांसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. तसेच, सोबत एक नोट शेअर करताना त्यांनी लिहिले, "आम्ही गरोदर आहोत हे जाहीर करताना आनंद होत आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे."
लग्नाच्या ८ वर्षानंतर या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील हा आनंद शेअर केला आणि एक निवेदनही जारी केले. निवेदनात असे लिहिले आहे की, "आम्ही तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनासाठी कृतज्ञ आहोत आणि तुम्ही आमच्या येणाऱ्या नव्या पाहुण्यावर अशाच प्रेमाचा वर्षाव करत रहावे अशी आमची इच्छा आहे."
अॅटली एक भारतीय चित्रपट निर्माते आहेत ज्यांनी दक्षिण भारतीय कमर्शियल सिनेमाचा चेहरा बदलत इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक बनले. तसेच, २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट, 'बिगिल 'सह भारतातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता बनण्यासाठी त्यांनी सर्व अडचणींवर मात केली.
अॅटली यांचा पहिला बॉलीवुड प्रोजेक्ट जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल, पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. अशातच, या चित्रपटात भारतीय सुपरस्टार आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा समावेश आहे. अनेक वर्षांच्या प्रेमानंतर अॅटली यांनी २०१४मध्ये अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्न केले. तसेच, "ए फॉर ऍपल प्रॉडक्शन" हे प्रोडक्शन हाऊस सुरू करून या बॅनरखाली दोन चित्रपटांची यशस्वी निर्मितीदेखील केली. आता लग्नाच्या ८ वर्षांनंतर, अॅटली आणि प्रिया त्यांच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. अशातच, अॅटली आणि प्रियाने अनेक इमोशन्ससह आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.