शिझानने सांगितले तुनिषाशी ब्रेकअप करण्याचे कारण; म्हणाला, श्रद्धा वालकर प्रकरणामुळे...

शिझान खानने पोलिसांसमोर तुनिषा शर्माशी विभक्त झाल्याचे कारण सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे
शिझानने सांगितले तुनिषाशी ब्रेकअप करण्याचे कारण; म्हणाला, श्रद्धा वालकर प्रकरणामुळे...

अवघ्या २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आणि अनेकांना याचा धक्का बसला. तिचा सहकलाकार आणि कथित प्रियकर शिझान खान याच्यासोबत १५ दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. यानंतर आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले असून याला शिझान कारणीभूत असल्याची टीका करण्यात आली. या प्रकरणाबद्दल आता नवे खुलासे झाले आहेत. शिझानने पोलिसांना दोन महत्त्वाची कारणे सांगितले. यामध्ये, त्याने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिझानने पोलिसांना सांगितले की श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे मीही अस्वस्थ झालो होतो. त्यानंतरच मी तुनिषाशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मी तुनिषाला म्हणलो होतो की, आपल्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे पण पुढे काही निर्णय घ्यायचा असेल तर धर्म आड येऊ शकतो. विभक्त होण्याचे दुसरं कारण त्याने दोघांची वय असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मी तुनिषाला सांगितले होते की, आपल्या दोघांमध्ये वयाचे बरेच अंतर आहे. त्यामुळे वेगळे झालेलं चांगलं. अशी २ कारणे ताईने पोलिसांना सांगितली आहेत. अद्याप अधिकृतरीत्या पोलिसांनी याबाबत माहिती दिलेली नाही. त्याची चौकशी अद्याप चालूच आहे.

तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती शिझान खानने पोलिसांना दिली आहे. याबाबत त्याने सांगितले की, आम्ही विभक्त झालो त्याच्या काही दिवसांनंतर तुनिषाने आत्महत्येचा प्रयन्त केला होता. मात्र, त्यावेळी मी तिला वाचवले होते. त्यावेळी तिच्या आईला भेटून तुमच्या मुलीकडे लक्ष द्या, तिची काळजी घ्या, असेदेखील सांगितले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in