Shefali Shah: शेफाली शाहच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा; एले इम्पॅक्ट अवॉर्डने करण्यात आले सन्मानित!

सब्यसाचीने डिझाइन केलेल्या सुंदर अशा गुलाबी पारंपारिक पोशाखात, शाह खूपच सुंदर आणि शाही दिसत होती.
Shefali Shah: शेफाली शाहच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा; एले इम्पॅक्ट अवॉर्डने करण्यात आले सन्मानित!
Published on

शेफाली शाहने एका पाठोपाठ चित्रपट देऊन आणि त्याबद्दल तिला मिळालेल्या पुरस्कारांसह हे वर्ष तिच्यासाठी यशस्वी ठरले आहे. 'जलसा', 'ह्यूमन' आणि 'डार्लिंग्ज'मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्रीने 'दिल्ली क्राइम 2'मध्ये आणखी एक नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. अशातच, शेफाली शाहला एले इम्पॅक्ट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

सब्यसाचीने डिझाइन केलेल्या सुंदर अशा गुलाबी पारंपारिक पोशाखात, शाह खूपच सुंदर आणि शाही दिसत होती. पुरस्कार आणि 'इम्पॅक्ट'या शब्दाबद्दल विचारले असता, अभिनेत्री म्हणाली, "इम्पॅक्ट'हा शब्द खरोखरच मजबूत आणि सामर्थ्यवान वाटतो, परंतु माझ्यासाठी अभिनय म्हणजे माझे विचार व्यक्त करणे आणि मला शक्य असलेल्या प्रत्येक स्वरूपात दाखवणे. आणि मला वाटते की लोक त्याच्याशी कनेक्ट होऊ शकले आहेत आणि त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला 'इम्पॅक्ट'हा एक महत्वपूर्ण आणि शक्तिशाली शब्द वाटत नाही कारण मला खरोखर विश्वास आहे की वलनरेब्लिटीमध्ये शक्ती आहे."

अलीकडेच, शेफाली शाहने मेलबर्न २०२२ च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) पुरस्कारही जिंकला. शेफाली शाह ही एक उत्कृष्ट कलाकार आहे आणिअसून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डार्लिंग्स'मधील तिच्या अभिनयासाठी तिला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

शिवाय, २६ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'दिल्ली क्राइम'च्या दुसऱ्या सीझनसह प्रेक्षक त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्क फ्रंटवर, 'दिल्ली क्राईम 2' व्यतिरिक्त, शेफालीला आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत 'डॉक्टर जी' मध्ये देखील पाहायला मिळाले.

logo
marathi.freepressjournal.in