अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा
Published on

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

बेस्ट डील टीव्ही प्रा.लि.चे संचालक असलेल्या शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली दीपक कोठारी यांच्याकडून ६० कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सन २०१५ ते २०२३ या कालावधीत ही रक्कम घेण्यात आली होती. मात्र कुंद्रा दाम्पत्याने कट रचून ही रक्कम व्यावसायिक कामासाठी न वापरता आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याची तक्रार दीपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. ही कर्जाची रक्कम हडप करून आपली फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखेने जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in