शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला तूर्तास दिलासा; कारवाई करणार नसल्याची ED ची हायकोर्टात हमी

दाम्पत्याविरुद्ध बजावलेल्या नोटिसीला अनुसरून तूर्तास कुठलीही कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने उच्च न्यायालयात दिली.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला तूर्तास दिलासा; कारवाई करणार नसल्याची ED ची हायकोर्टात हमी
Published on

मुंबई : बिटकॉईन फसवणूक प्रकरणी जुहू व पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्याची ईडीने बजावलेल्या नोटिसीमुळे अडचणीत आलेली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना तुर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

दाम्पत्याविरुद्ध बजावलेल्या नोटिसीला अनुसरून तूर्तास कुठलीही कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने उच्च न्यायालयात दिली. त्याची दखल घेत न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने दाम्पत्याला कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले.

ईडीने कुंद्रा दाम्पत्याला नोटीस बजावून जुहू येथील घर तसेच पुण्यातील पवना धरणाजवळ असलेले फार्म हाऊस नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांत रिकामे करण्याचे आदेश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in