‘बिग बॉस १६’च्या अंतिम २मध्ये मराठमोळा शिव ठाकरे नाही? त्या ट्विटनंतर चर्चांना उधाण

‘बिग बॉस १६’ आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असताना एका ट्विटमुळे शिव ठाकरेला अंतिम २मध्ये जागा मिळणार की नाही? या चर्चांना उधाण आले आहे
‘बिग बॉस १६’च्या अंतिम २मध्ये मराठमोळा शिव ठाकरे नाही? त्या ट्विटनंतर चर्चांना उधाण

‘बिग बॉस १६’ हा कार्यक्रम आपल्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशामध्ये प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती मराठमोळा शिव ठाकरे यावर्षी बाजी मारणार का? याची. त्याने मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वत विजेतेपद मिळवले होते. तर, हिंदी बिग बॉसच्या या १६व्या पर्वामध्येही त्याला विजयाचा दावेदार मानले जात आहे. त्याला कलाक्षेत्रातून तसेच राजकीय क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. असे असतानाही एका ट्विटमुळे त्यांची अंतिम २मध्ये निवड होणार की नाही? अशी चर्चा सुरु झाली आहे.

‘बिग बॉस तक’ या फॅनपेजद्वारे करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, प्रियांका चौधरी व एमसी स्टॅन टॉप २मध्ये असणार आहेत. शिव ठाकरेला बाजूला केले जात आहे, असे या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांमध्येही शिव ठाकरेने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. अशामध्ये आता कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सध्या घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत. शिवला महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ यांसारख्या मराठी कलाकारांकडून पाठिंबा मिळत आहे. शिवला अधिकाधिक वोट करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in