Shiv Thakare : इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये शिव ठाकरेकडे तरुणीची अजब मागणी; म्हणाली, 'मला बॉयफ्रेंड...'

बिग बॉस १६चा उपविजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चांगलाच चर्चेत आला असून नुकतेच त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह करत चाहत्यांशी सवांद साधला
Shiv Thakare : इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये शिव ठाकरेकडे तरुणीची अजब मागणी; म्हणाली, 'मला बॉयफ्रेंड...'

बिग बॉस १६चा विजेता एमसी स्टॅन ठरला. पण, खरी चर्चा झाली ती उपविजेता ठरलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरेची. (Shiv Thakare) त्याने जेतेपद जरी पटकावले नसले तरीही आधी महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवलेल्या शिवणे देशभरात आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. बिग बॉस १६मुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच भर पडली आहे. त्याने नुकतेच इंस्टाग्राम लाईव्ह करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने एक मोठी घोषणा केली. पण, एका तरुणीने त्याच्याकडे अजब मागणी केली आणि ती चांगलीच चर्चेत आली.

इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान शिव ठाकरेला एका तरुणी म्हणाली की, "मला बॉयफ्रेंड शोधून दे". त्या तरुणीचा हा मेसेज वाचून थोडावेळ तो निशब्द झाला. त्यानंतर तो म्हणाला की, 'मी हे नाही करू शकत.' त्यानंतर पुढे त्याने चाहत्यांचे त्याचबरोबर ज्या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला, त्या कलाकारांचेही आभार मानले. तसेच, तो म्हणाला की, "मी लवकरच एका मोठ्या बजेटच्या चित्रपटामध्ये तुम्हाला दिसणार आहे. तसेच, या चित्रपटामध्ये मी एका सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे." अशी घोषणा केली. त्यामुळे आता शिव ठाकरे कोणत्या चित्रपटामध्ये दिसतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in