‘शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
Published on

मुंबई : कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थगितीची मागणी करणाऱ्या एव्हरेस्ट इंटरटेन्मेंट एलएलपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, जी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची मक्तेदारी असू शकत नाही अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारत स्थगितीची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२००९ साली महेश मांजरेकर यांच्या अश्वमी फिल्म्ससोबत 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाची सहनिर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आधीच्या चित्रपटाच्या शीर्षक आणि पटकथेवर विशेष कॉपीराइट असल्याचा दावा केला होता.

logo
marathi.freepressjournal.in