खिलाडी कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगला सुरुवात

पूजा एंटरटेनमेंटचा आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र
खिलाडी कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगला सुरुवात

पूजा एंटरटेनमेंटचा आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच, पृथ्वीराज सुकुमारन देखील या सिनेमाद्वारे खलनायकाच्या व्यक्तीरेखेतून आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्शकांच्या भेटीला येणार आहेत. अली अब्बास जफरद्वारे दिग्दर्शित होणाऱ्या या चित्रपटात पूर्वी कधीही न पाहिलेले अ‍ॅक्शन सेट, जगभरातील क्रू, विशेष टेक्नोलॉजी आणि उपकरणे यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशातच, अनेक महिन्यांच्या कठोर तयारीनंतर 'बीएमसीएम'च्या निर्मात्यांनी सर्व कलाकार, क्रू आणि सिनेसृष्टीतील शुभचिंतकांसह चित्रपटाच्या शूटिंगची शुभ मुहूर्तावर सुरुवात केली.

वाशू भगनानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या मुहूर्त शॉटबद्दलचा उत्साह व्यक्त केला.

निर्माता जॅकी भगनानी यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारे निर्मिती असलेल्या, वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत आणि अली अब्बास जफरद्वारा लिखित, दिग्दर्शित तसेच, एएझेड फिल्मच्या सहयोगाने पूजा एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्शन एंटरटेनर 'बड़े मियां छोटे मियां'हा चित्रपट डिसेंबर २०२३मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in