
विकी कौशल अभिनीत 'सॅम बहादूर'या बहुप्रतीक्षित चित्रपटाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असून, त्यांची रील पत्नी सिल्लूची भूमिका सान्या मल्होत्रा साकारणार आहे, तर फातिमा सना शेखला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे. अशातच, विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'सॅम बहादूर'या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मेघना गुलजारद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट हाऊस ऑफ आरएसव्हीपी मुव्हीजच्या प्रोडक्शन अंतर्गत बनवला जात आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.
अलीकडेच, चित्रपटात सॅम बहादूर यांची भूमिका साकारत असलेल्या विकी कौशलने दिग्दर्शक मेघना गुलजार सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली. 'सॅम बहादूर' - भारतातील सर्वात शूर वॉर हिरो आणि पहिले फील्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांची कथा आहे, ज्यामध्ये, विकी कौशलसह सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच, मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आरएसव्हीपी (RSVP) करत आहेत. हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांच्या चार दशकांच्या आणि पाच युद्धांच्या लष्करी कारकिर्दीवर आधारित आहे. फील्ड मार्शल पदावर प्रमोट होणारे ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. तसेच, १९७१च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. अशातच, 'सॅम बहादूर'हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.