सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

सलमानच्या घरावर गोळीबार करणारे सागर पाल आणि विकी गुप्ता यांना थापनने पिस्तूल पुरविले होते. पाल आणि गुप्ता यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणाशी संबंधित एका आरोपीने बुधवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.

मृत आरोपीचे नाव अनुज थापन (२३) असे असून त्याने कोठडीतील शौचालयात चादरीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत आझाद मैदानात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

थापन याला सोनू कुमार बिश्नोई याच्यासह पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सलमानच्या घरावर गोळीबार करणारे सागर पाल आणि विकी गुप्ता यांना थापनने पिस्तूल पुरविले होते. पाल आणि गुप्ता यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

थापनने हल्ल्यासाठी पुरवली होती पिस्तुले

थापन हा बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रे बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना थापन याने दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे पुरविली होती. ती बिश्नोई टोळीकडून देण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in