‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’वर लघुपट; अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मिळणार इतिहासाला उजळणी

देश रक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलात सक्षम आणि प्रशिक्षीत अधिकाऱ्यांची गरज आहे.
‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’वर लघुपट; अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मिळणार इतिहासाला उजळणी

पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा इतिहास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात उजळणार आहे.

पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’ने ७५ वर्षांत पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

देश रक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलात सक्षम आणि प्रशिक्षीत अधिकाऱ्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्समधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली त्यावेळी म्हणजेच १९४९ साली ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची (एनडीए) स्थापना करण्यात आली. येथे उच्च शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण एकत्र दिले जाते. येथे १८ ते १९ व्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अतिशय शिस्त आणि बाहेरच्या जगापासून लांब, मौज-मजेपासून लांब ठेवत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यावर आधारित ही लघुपट ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने तयार करण्यात आला आहे.

६ ऑक्टोबर १९४९ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडकवासला परिसरात ‘एनडीए’ची पहिली वीट रचली. त्यावेळी हा परिसर घनदाट जंगलाचा होता. तिन्ही सेनांच्या प्रशिक्षणासाठी हा परिसर अतिशय चांगला होता. त्यामुळे या ठिकाणी या अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू खडकवासला येथील जंगलाचे आता शहरात रूपांतर झाले. अशाच बदलत्या काळात ‘एनडीए’मध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्यांना संरक्षण दलाचे अधिकारी कसे बनवले जाते, याची माहिती या लघुपटातून देण्यात आली आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात असामान्य योगदान असलेल्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए. याच ‘एनडीए’चा इतिहास लघुपटाच्या माध्यमातून देशवासियांसाठी मांडण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. या लघुपटात ‘एनडीए’च्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला असून, हा लघुपट सर्वांनाच आवडेल, असा विश्वास आहे.

-पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in