अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट ॲटॅक

श्रेयसला त्यानंतर तातडीनं अंधेरीच्या बेलेव्व्ह्यू हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी नेहण्यात आले आहे .
अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट ॲटॅक

मराठीमोळा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपडेला 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या सेटवर हदयविकाराचा झटका आला आहे. या खबरीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. श्रेयसला त्यानंतर तातडीनं अंधेरीच्या बेलेव्व्ह्यू हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी नेहण्यात आले आहे . त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर आता डॉक्टरांनी त्याच्या तब्यतेविषयी माहिती दिली आहे.

श्रेयस हा ४७ वर्षीचा आहे. हा गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तो त्याच्या नेहमी प्रभावी भूमिकांमुळे चाहत्यांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. चित्रपट, मालिकांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकवर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.अशात श्रेयसला आलेल्या या हदयविकाच्या झटक्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. श्रेयस हा बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शुटींग करत होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. श्रेयस हा फिरोज नाडियावाला यांच्या वेलकम टू द जंगल नावाच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांत त्याला डिस्चार्जही देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. "इंडिया टुडे"नं याबाबत वृत्त दिले आहे.या बातमीने सगळ्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in