71st National Film Awards: ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; शाहरूख, विक्रम मेस्सी सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

मराठी चित्रपटांसाठी ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच ‘नाळ-२’ चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेता शाहरूख खानला ‘जवान’साठी आणि विक्रांत मेस्सीला ‘१२th फेल’ चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
71st National Film Awards: ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; शाहरूख, विक्रम मेस्सी सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
Published on

नवी दिल्ली : मराठी चित्रपटांसाठी ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच ‘नाळ-२’ चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेता शाहरूख खानला ‘जवान’साठी आणि विक्रांत मेस्सीला ‘१२th फेल’ चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्युरी प्रमुख व चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी २०२३ चे हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले.

‘कथल : अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे संवाद दीपक किंगराणी यांनी लिहिले आहेत.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘द केरला स्टोरी’बद्दल सुदीप्तो सेन यांना मिळाला, तर करण जोहर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर राष्ट्रीय, सामाजिक मूल्याचा चित्रपट म्हणून ‘सॅम बहादूर’ला पुरस्कार मिळाला. ‘वेशभूषा’ व ‘रंगभूषा’ या दोन्ही गटात या चित्रपटाला गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त चित्रपटांची यादी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरूख खान (जवान) आणि विक्रांत मॅसी (१२th Fail)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - केरला स्टोरी – सुदीप्तो सेन,

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजयराघवन (पुक्कलम) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर (पार्किंग)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - उर्वशी (उल्लोझुक्कू) आणि जानकी बोडीवाला (वश)

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार - सुक्रिती वेणी बंदरेड्डी, कबीर खंडाणे आणि त्रिशा ठोसर

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - प्रशांतनु महापात्रा (द केरला स्टोरी)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा - साई राजेश नीलम (बेबी) आणि रामकुमार बालकृष्ण (पार्किंग)

  • सर्वोत्कृष्ट संवाद लेखक - दीपक किंगराणी, (सिर्फ एक बंदा काफी है)

  • सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट - श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर (सॅम बहादूर)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - पीव्हीएम एस. रोहित (प्रेमिथुन्ना)

logo
marathi.freepressjournal.in