Siddhaanth Vir: अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशीचे ४६व्या वर्षी निधन; जिममध्येच कोसळले आणि...

Siddhaanth Vir: अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशीचे ४६व्या वर्षी निधन; जिममध्येच कोसळले आणि...

कुसुम फेम अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशीचे (Siddhaanth Vir) शुक्रवारी जिममध्ये व्यायाम करताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सुपरमॉडेल अलेसिया राऊत आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे.
Published on

कुसुम, वारीस आणि सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या शोमधील (Siddhaanth Vir) भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशीचे शुक्रवारी वयाच्या ४६व्या वर्षी निधन झाले. जिममध्ये वर्कआउट करताना ते कोसळले. त्यांच्या पश्चात पत्नी, सुपरमॉडेल अलेसिया राऊत आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे. जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर अली आहे. सिद्धांतला त्यांच्या प्रशिक्षकाने रुग्णालयात नेले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

डॉक्टरांनी सिद्धांतला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतरचा हा तिसरा मृत्यू आहे ज्यांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. अभिनेता जय भानुशालीने इंस्टाग्रामवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने सिद्धांतचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये “अगदी लवकर गेले” असे लिहिले आहे. जयने सांगितले की त्याला कॉमन फ्रेंड्सनी मृत्यूची माहिती दिली होती. व्यायामशाळेत कोसळल्याने सिद्धांतचा मृत्यू झाल्याचीही त्याने पुष्टी केली.

मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर, सिद्धांत वीर सुर्यवंशी, ज्यांना आनंद सूर्यवंशी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी कुसुममधून पदार्पण केले. त्यांनी अनेक शोमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या आहेत. कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है यांसारख्या कार्यक्रमांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या शेवटच्या प्रोजेक्ट्समध्ये 'क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'जिद्दी दिल' या टीव्ही शोचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in