सिद्धार्थ चांदेकरनं लावलं आईचं दुसरं लग्न ; सर्व स्तरातून होतोय कौतूकांचा वर्षाव

सिद्धार्थनं आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या निर्णयाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे.
सिद्धार्थ चांदेकरनं लावलं आईचं दुसरं लग्न ; सर्व स्तरातून होतोय कौतूकांचा वर्षाव

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईनं दुसरं लग्न केलं असून सिद्धार्थनं स्वतः पुढाकार घेत त्यांची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावलंय. सिद्धार्थनं आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सिद्धार्थनं आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या निर्णयाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे.

यात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणते, "हे खुप सुंदर आहे. खुप खुप शुभेच्छा" अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, "अभिनंदन.. प्रत्येकाला मनासारखा जगण्याचा अधिकार आहे. खूप छान."

मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर याने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून तो म्हणतो की, "हे खुप छान आहे, खुप शुभेच्छा काकू तुम्हाला" या याशिवाय अभिनेत्री स्पृहा जोशीने कमेंट केलीय की, "Sidhdhuuuu काकू जगातला सर्व आनंद घेण्यास पात्र आहेत. अभिनंदन सीमा काकू". अशा प्रकारे सिद्धार्थ चांदेकरच्या या निर्णयाचं कौतुक होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in