संगीत कार्यक्रमात सिद्धार्थ मल्होत्राचे वडील अचानक पडले आजारी

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात असून सर्वांच्या नजरा त्यांच्या पहिल्या फोटोकडे लागले आहेत.
संगीत कार्यक्रमात सिद्धार्थ मल्होत्राचे वडील अचानक पडले आजारी

गेले अनेक दिवस चर्चच्या असलेल्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नसोहळ्यात अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या कुटुंबासोबतच अनेक दिग्गज कलाकार आणि इतर मान्यवर जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये दाखल झाले असून ६ फेब्रुवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अशामध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान सिद्धार्थच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अचानक उलट्या होऊ लागल्याने त्वरित डॉक्टरांना बोलवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या वडिलांना उपचारानंतर काही तास आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. सिद्धार्थच्या वडिलांच्या तब्येतीचा विचार करता संगीत कार्यक्रमातील गाण्यांचा आवाज कमी करण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील मोजके सेलिब्रिटी हजर राहणार आहेत. शनिवारी कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबीयांसह जैसलमेरला दाखल झाले. यावेळी विमानतळावर कियारा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत दिसली. या लग्नसोहळ्याला पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच, सोहळ्यामध्ये नो फोन पॉलिसी वापरण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in