
दिवंगत पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू मूसेवाला हा अवघ्या कमी वयातच पंजाबी संगीत क्षेत्रात आपली मोठी छाप पाडून गेला. त्याची अनेक गाणी चाहत्यांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला होता. अजूनही त्याचे चाहते दुःखातून आभार आलेले नाहीत. अशामध्ये आज त्याचे एक गाणे प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे या गाण्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्यूज मिळाले.
दिवंगत सिद्धू मुसेवालाचे 'मेरा नाम' हे गाणे आज युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याने युट्युबवर येताच अवघ्या १० मिनिटांमध्ये लाखो व्ह्यूज कमावले. तसेच, फक्त एका तासात १० लाखहुन अधिक व्ह्यूज मिळाले. हे गाणे सिद्धू मुसेवाला यानेच गायले असून त्याचे संगीत स्टील बांगलाझने दिले आहे. तसेच, या गाण्यात ग्रॅमी पुरस्कार विजेता नायजेरियन रॅपर बर्ना बॉयनेही आपला आवाज दिला आहे.
दरम्यान, सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी पुढील काही वर्षे त्याची गाणी प्रदर्शित करत राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच्या निधनानंतरचे हे तिसरे गाणे आहे. यापूर्वी त्याची २ गाणे प्रदर्शित करण्यात आली होती. त्याचे नुकतेच प्रदर्शित झालेले 'मेरा नाम' हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.