Nandini Srikar: संगीतकार आणि गायिका नंदिनी श्रीकर यांची सुरेल हॅट्रिक, मिळवले मानाचे पुरस्कार!

Indian Singer: आपल्या मधुर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूड गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटात गाणं गायलं आहे.
Nandini Srikar: संगीतकार आणि गायिका नंदिनी श्रीकर यांची सुरेल हॅट्रिक, मिळवले मानाचे पुरस्कार!

Singer Nandini Srikar: नंदिनी श्रीकर एक भारतीय पार्श्वगायिका, संगीतकार आणि गिटार वादक आहे. पार्श्वभूमी नंदिनी श्रीकर यांचा जन्म १० ऑगस्ट १९६९ रोजी झाला.त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यानंतर एका सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. वयाच्या अवघ्या तीन वर्षापासून त्यांनी वीणा, सितार आणि गिटार शिकायला सुरुवात केली. त्यांनी नेहमी संगीताकडे केवळ छंद म्हणून बघितले. परंतु १९९७ मध्ये, पार्श्वगायक हरिहरन यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि विद्यासागर यांना त्यांच्या आगामी चित्रपट उइरोडू उईरागासाठी गाण्यासाठी घेण्यास सुचवले. नंदिनी यांनी तेव्हा पहिल्यांदाच चित्रपटात गायक केकेसोबत 'आय लव्ह यू' नावाचे गाणं गायलं. हे गाणं तेव्हा हिट झाले. यानंतर त्यांनी नोकरी सोडून संगीतावर लक्ष केंद्रित केले. पुढे त्रिलोक गुर्टू , रणजीत बारोट अशा दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. आयटीतल्या जॉबमुळे तंत्रज्ञानाचा सुरेख उपयोग करत संगीतातही नंदिनी यांनी वेगवेगळे प्रयोग केले कॉफी आणि एअरलाइन्सच्या जाहिरातींसाठी त्यांनी अनेक जिंगल्स केल्या. त्यानंतर अनेक उत्तम काम मिळत गेली. २००१ मध्ये त्या मेहमूद खानच्या पनाह अल्बममध्ये दिसल्या होत्या.

सुरेल हॅट्रिक

आपल्या मधुर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूड गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटात गाणं गायलं आहे. याच गाण्यामुळे त्यांनी सुरेल हॅट्रिक साधली आहे. ‘उनाड’ चित्रपटातील ‘क्षण काळचे’ या गाण्यासाठी यंदाचा फिल्मफेअर, झी चित्रपट गौरव, मटा सन्मान असे तीन अतिशय मानाचे पुरस्कार पटकावत त्यांनी आपली छाप पाडली आहे. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंदिनी सांगतात की, "आपल्या कामाला प्रेक्षकांची पोचपावती मिळणं आवश्यक आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मला ती मिळाली आहे. मला ‘उनाड’ च्या टीमने ही संधी दिल्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे."

मराठीत पदार्पण

कर्नाटक, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य संगीत या सगळ्या प्रांतात गाणं त्यांनी गायलं आहे. मुशाफिरी करणाऱ्या नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ च्या निमित्ताने मराठीतही आपल्या आवाजाच्या गोडव्याने आपला वेगळेपणा सिद्ध करून दाखविला आहे. अर्थ क्रिएशन, ऑरोरा प्रोडक्शन आणि नम्रता आर्ट्सच्या बॅनरखाली चंद्रेश भानुशाली, अजित अरोरा व प्रीतेश ठाकूर यांनी 'उनाड' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांचं आहे. आशितोष गायकवाड, हेमंल इंगळे, देविका दफ्तरदार, देवेंद्र पेम या कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in