'मन पाखरवानी' हे - अदिती द्रविड आणि साईंकीत कामत ह्या जोडीवर चित्रित झालेलं, साई-पीयूष यांनी संगीतबद्ध केलेल आणि सावनी रवींद्रने गायलेल, रोमॅंटिक अंदाज अणि सुमधुर मेलडी सारेगामा मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आता उपलब्ध आहे. या व्हिडीओमध्ये अदिती द्रविड आणि साईंकीत कामत यांच्यातील आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हे दृश्य आणि श्रवणीय आनंद देणारे आहे.
एका गावकड़ची गोष्ट असलेल हे गाणं आहे. लहानपणीचं गोड प्रेमाचं नातं अनेक वर्षांनी पुन्हा खुलतंय. गाण्याचा हिरो परदेशातून गावाला परततो, आणि हे नायिकेला कळताच, तिची हूरहूर सुरू होते.
आपलं पहिलं वहिलं प्रेम किती वर्षांनी आपल्या समोर येणार आणि तो दिसता क्षणी, ती त्याच्या डोळ्यात हरवून जाते. अख्खा गाव स्वागताला गोळा होतो, सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण पसरतं. त्या पुढील पूर्ण दिवस नायिका , स्वप्न रंजनात बुडून जाते आणि अगदी लग्नापर्यंत पोहोचते. नायक - नायिके मधील गोड क्षण, रोमान्स, अदिती आणि साईंकीत ने अगदी सहज-सुंदर अभिनयातून पोचवला आहे आणि खरंच प्रेक्षकांना प्रेमात पाडलं आहे.
ह्या शिवाय, ह्या गाण्यातली लोकप्रियता मिळवणारी गोष्ट म्हणजे अभिनेत्री अदिती द्रविड चा कधिही न पाहिलेला लूक २ वेण्या , त्यात माळलेला गजरा, आणि परकर पोलकं आणि दुसरं म्हणजे गाण्याचे शब्द! प्रत्येकाला रिलेटेबल वाटणारे आणि चाली सोबत लगेच ओठांवर बसणारे - संगीतकार पियूष कुलकर्णी हाच त्याचा गीतकार ही आहे.
एक सुंदर प्रेमगीत जे त्याच्या मधुर सूर आणि मनमोहक गीतांसह प्रणयाचे सार कॅप्चर करते. सारेगामा मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर हे संगीत प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि ते आघाडीच्या संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे . तिच्या अष्टपैलू गायन पराक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या सावनी रवींद्रच्या भावपूर्ण आवाजाने हे गाणे जिवंत झाले आहे.
ह्या गाण्याला संगीत प्रसिद्ध संगीतकार जोडी साई - पियुष यांनी दिले आहे, ज्यांनी आधुनिक आणि पारंपारिक आवाजांचे सुसंवादी मिश्रण तयार केले आहे. पियुष कुलकर्णीने आणि आदिती द्रविड ह्यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली आहे.
सग्ळ्यात खास गोष्ट म्हणजे बाईपण भारी देवा च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा तीच म्युझिकल टीम एकत्र ह्या गाण्यामार्फत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.