Sonakshi Sinha: 'माझी मर्जी आहे...' झहीर इक्बालसोबत लग्नाच्या अफवांवर सोनाक्षी सिन्हाने सोडले मौन

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Marriage: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता आणि दीर्घकाळचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे.
Sonakshi Sinha breaks silence on marriage rumors with Zaheer Iqbal
@iamzahero/ Instagram

Sonakshi Sinha Marriage: 'हिरामंडी: द डायमंड बाजार'मधून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली सोनाक्षी सिन्हा सध्या तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता आणि दीर्घकाळचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. चर्चेनुसार सोनाक्षी आणि झहीर २३ जून रोजी मुंबईत एका इंटिमेट सोहळ्यात लग्न करणार आहेत. पण याबद्दल अभिनेत्रीचे वडील ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना या लग्नाबद्दल काहीच माहिती नाही असं सांगितलं. पंरतु आता अखेरीस 'दबंग' अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या वृत्तावर मौन सोडले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्याबद्दल बातम्या येत आहेत की दोघे २२-२३ जून रोजी लग्न करणार आहेत. दोघांनाही आपलं लग्न खाजगी ठेवायचं आहे, त्यामुळे सगळी तयारी गुपचूप सुरू असल्याचंही बोलले जात आहे. सोनाक्षी सिन्हाने लग्नाबाबत मीडियामध्ये सुरू असलेल्या विविध चर्चांवर अखेर मौन तोडले आहे. आयदिवाला दिलेल्या मुलाखतीत, सोनाक्षी म्हणाली की लोक तिच्या लग्नाबद्दल इतके 'चिंता' का आहेत हे तिला समजत नाही. तिने असेही सांगितले की अशा मीडिया रिपोर्ट्सचा तिला त्रास होत नाही.

लग्नाच्या बातम्यांवर सोनाक्षीची प्रतिक्रिया

तिच्या लग्नाच्या अफवांवर बोलताना सोनाक्षी म्हणाली की, "मी याकडे फारसे लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ही माझी निवड आहे, त्यामुळे लोकांना एवढी काळजी का आहे हे मला कळत नाही. माझ्या आई-वडिलांपेक्षा लोकच मला माझ्या लग्नाबद्दल अधिक विचारतायेत. मला ते खूप मजेदार वाटत आहे, मला हे सगळं त्रास देत नाही."

सोनाक्षी आणि झहीर गेल्या काही काळापासून डेट करत आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली देण्यापासून कधीही मागे हटले नाही. दोघे अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांबद्दल पोस्ट करतात.

logo
marathi.freepressjournal.in