
बॉलीवूडचा मेगास्टार सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'ची चर्चा सर्वत्र रंगत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे 'नैयो लगदा' रिलीज झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी सिनेमातील दुसरे गाणे 'बिल्ली बिल्ली'चा ऑडिओ रिलीज केला ज्याने सिनेप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. अशातच, आता 'बिल्ली बिल्ली'या गाण्याचा ऑफिशल टिझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे ज्यामध्ये दर्शकांना सलमान खान आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री पाहायला मिळेल.
'सौदा खरा खरा' आणि 'इश्क तेरा तडपावे' यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गायक सुखबीर यांनी 'बिल्ली बिल्ली'हे गाणे गायले आणि कंपोज केले आहे. तसेच, 'बिल्ली बिल्ली' एक जबरदस्त पंजाबी डांस नंबर असून, यामध्ये मेगास्टार आणि सुखबीर पहिल्यांदाच गाण्यासाठी सहयोग करत आहेत. अशातच, सलमान खानची हुक स्टेप असलेले 'बिल्ली बिल्ली'हे गाणे 2 मार्च रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.